अधिवेशनात ‘त्या’ शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार, ‘या’ मंत्र्यानं शेतकऱ्यांना सरकारकडून दिला विश्वास
VIDEO | अवकाळी पावसात कांदा, गहू, मूग आणि हरभरासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान, मात्र या मंत्र्यानं दिला शेतकऱ्यांना सरकारकडून विश्वास
धुळे : राज्यभरात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसात कांदा, गहू, मूग आणि हरभरासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्याचे अश्वासनही गिरीश महाजन यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्येच या विषयावर चर्चा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करून त्यांना आर्थिक मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनशीलपणे विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.