Gopichand Padalkar : ‘वाघ्या’च्या वादात गोपीचंद पडळकर यांची उडी, शरद पवारांवर आगपाखड, उदयनराजेंबद्दल काय म्हणाले?
वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाजवळ बंदोबस्त वाढवण्याची गरज असल्याचे म्हणत किल्ले रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाजवळ आणखी १० ते २० पोलीस वाढवण्यात यावे, अशी विनंती गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे केली.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या वादात उडी घेतली आहे. किल्ले रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाजववळ आणखी 10 ते 12 पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात यावा, अशी मागणीच गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. उदयनराजे भोसलेंबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. पण नेता जेव्हा अडचणीत येतो किंवा सत्ता जाते तेव्हा असे मुद्दे शोधून काढले जातात. वाघ्याच्या स्मारकाचा मुद्दाही ब्रिगेडींनी काढला आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. शरद पवार यांना माझी एक विनंती आहे. पवारांनी त्यांचा पक्ष अजित पवारांकडे दिला आहे. आता शरद पवार यांच्याकडे फावला वेळ आहे. त्यामुळे त्यांनी या दोन वर्षात त्यांना पाहिजे तसा इतिहास लिहावा, असा खोचक टोलाही पडळकर यांनी लगावला आहे. गोपीचंद पडळकर हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट

असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
