Tv9 मराठी Special Report : राहुल गांधी यांच्याविरोधात ‘जोडे मारो’ अन् विधानभवनात उमटले पडसाद
VIDEO | वीर सावरकरांवरून राहुल गांधी विरोधात रोष, विधानसभच्या आवारात जोडे मारो आंदोलन तर सभागृहात खडाजंगी, बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : राहुल गांधी यांच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप देशभरात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र विधानभवनात याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर जोडे मारण्यात आले असून आंदोलन करण्यात आलं. याप्रकरणी विधानसभेत एकच गदारोळ झाला. विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे यांची शिवसेना आक्रमक होत त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं आणि विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. यानंतर सत्ताधाऱ्यांनी सभागृहात राहुल गांधी यांच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्याप्रकरणी निषेधाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी केली. सत्ताधारी आमदार आक्रमक झाल्याने विधानसभेचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं. कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपचे अतुल भातखळकर पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले… बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट