Special Report | निधी वाटपात भाजपच नंबर 1
मुंबई : खाते वाटपात, भाजपचाच वरचष्मा आणि आता निधी वाटपातही भाजपनंच(BJP) बाजी मारली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्यातच शिंदे गटापेक्षा भाजपच्याच खात्याला, अधिक निधीची तरतूद आहे. विशेष म्हणजे निधी वाटपावरुन नाराजी व्यक्त करुन शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांवर(Ajit Pawar) […]
मुंबई : खाते वाटपात, भाजपचाच वरचष्मा आणि आता निधी वाटपातही भाजपनंच(BJP) बाजी मारली. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. त्यातच शिंदे गटापेक्षा भाजपच्याच खात्याला, अधिक निधीची तरतूद आहे. विशेष म्हणजे निधी वाटपावरुन नाराजी व्यक्त करुन शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांवर(Ajit Pawar) भेदभाव केल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदारांचा होता. मात्र आता शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्याकरिता कमी निधीची तरतूद करण्यात आलीय. त्यामुळं शिवसेनेच्या सुनिल प्रभूंनी शिंदे गटाला टोले लगावलेत.
शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाईंनी, बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय. पुरवणी मागण्यांमधला निधी संबंधित विभागाच्या आवश्यकतेनुसार मिळाल्याचं, देसाई म्हणालेत. भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं. पण खाते वाटपात भरपाई करण्याचा प्रयत्न केला. अर्थ, गृह, सहकार, महसूल, ऊर्जा, जलसंपदा सारखी खाती भाजपच्या वाट्याला आलीत..आणि आता निधी वाटपातही भाजपची छाप दिसतेय.