Gopichand Padalkar : '100 शकुनी मेल्यावर...', पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख अन् मारकवाडीत येण्याचं सांगितलं कारण

Gopichand Padalkar : ‘100 शकुनी मेल्यावर…’, पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख अन् मारकवाडीत येण्याचं सांगितलं कारण

| Updated on: Dec 10, 2024 | 3:27 PM

गेल्या दोन दिवसांपूर्वी शरद पवार हे मारकडवाडीत आले होते. यावेळी त्यांनी ईव्हीएमचा विरोध केला होता. इतकंच नाहीतर मारकडवाडी ग्रामस्थांचं कौतुकही केले होते. याच पार्श्वभूमीवर आज भाजप नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मारकडवाडीत जाहीर सभा घेतली

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकडवाडीत ईव्हीएम समर्थनार्थ आज भाजप अन् महायुतीची जाहीर सभा घेण्यात आली. गेल्या दोन दिवसांपूर्वी शरद पवार हे मारकडवाडीत आले होते. यावेळी त्यांनी ईव्हीएमचा विरोध केला होता. इतकंच नाहीतर मारकडवाडी ग्रामस्थांचं कौतुकही केले होते. याच पार्श्वभूमीवर आज भाजप नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मारकडवाडीत जाहीर सभा घेतली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच शरद पवारांसह जयंत पाटील, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही घणाघात केला. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी उपस्थितांना ईव्हीएमवर महायुतीच्या बाजूने मतदान केलं का? असा सवाल केला. त्यामुळे महायुतीने मारकडवाडीला भेट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्रात देशात मारकडवाडी पॅटर्नची चर्चा म्हणताय, सर्वात पहिले हा पॅटर्न शरद पवारांना दिसला. ९० टक्के या गावात धनगर समाज राहतो. म्हणून जबाबदारी वाढली. या मतदारसंघात १०० गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले. महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले, १०० शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला.

Published on: Dec 10, 2024 03:27 PM