विनायक राऊत यांची ही शेवटची निवडणूक असणार? भाजप नेत्याचा मोठा दावा काय?
कालची सभा ही ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्ंया निरोपाची सभा होती. एक-दीड महिन्यांनंतर जेव्हा पण लोकसभा निवडणुका होतील, ती निवडणूक विनायक राऊत यांची शेवटची निवडणूक असणार आहे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी करत विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला
मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४ : भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, कालची सभा ही ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्ंया निरोपाची सभा होती. एक-दीड महिन्यांनंतर जेव्हा पण लोकसभा निवडणुका होतील, ती निवडणूक विनायक राऊत यांची शेवटची निवडणूक असणार आहे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी करत विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर कुणावरही वैयक्तिक टीका करायची नसून भाजपचा कार्यकर्ता असून माझ्यावर संघाचे विचार आणि संस्कार आहेत. संघाच्या विचारांचा अभ्यास करणारा मी असल्याने मी कोणावरही आता वैयक्तिक टीका करणार नाही, असेही नितेश राणे यांनी म्हटले. तर मी जनतेची सेवा करण्यासाठी सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिव्यांना उत्तर देण्यासाठी मला लोकप्रतिनिधी बनवलं नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला.