गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांवर हल्ला करणारे काल मातोश्रीवर होते, कुणी गंभीर आरोप?
VIDEO | वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या दिशेने मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत क्रिस्टल टॉवर येथील पार्किंगमध्ये असलेल्या त्यांच्या वाहनांची तोडफोड केली, या घटनेसंदर्भात भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहेत.
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३ | गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या दिशेने मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत क्रिस्टल टॉवर येथील पार्किंगमध्ये असलेल्या त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. सदावर्ते यांच्या वाहनांवर हल्ला करणारे काल मातोश्रीवर होते, असा गंभीर दावा नितेश राणे यांनी केला. तर जी मुलं काल मातोश्रीच्या बाहेर फिरताना दिसत होती तीच आज सकाळी गुणरत्न सदावर्तेची गाडी फोडताना दिसली. त्यामुळे त्या मुलांच्या कॉल रेकॉर्डिंग तपासावे. त्यांच्या टॉवर लोकेशनची तपासणी व्हायला हवी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. तर काल अगर ही मुलं मातोश्रीवर उपस्थित होती आणि आज ती गाडी तोडताना दिसत असतील तर गाडी तोडताना त्या ठिकाणी कॅमेरामॅन कसे उपस्थित असू शकतात? म्हणजे हा पूर्वनियोजित कट होता का? असा सवालही नितेश राणे यांनी केला.