आदू बाळा… म्हणत भाजप नेत्यानं आदित्य ठाकरे यांना फटकारलं, काय केली खोचक टीका?
VIDEO | 'बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने दुसर्यांना शहाणपण शिकवायचे नसते', भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बघा नेमकी काय केली टीका?
मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | जनतेच्या पैशावर मंत्री परदेशात सहल करतात, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावर बोलत होते. तर आदित्य ठाकरेंच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत जाणार्या अधिकार्यांचा खर्च केलेला आहे. जपान दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक आली, याची संपूर्ण टाईमलाईन त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. मोठी गुंतवणूक त्यांच्या या दौर्यामुळे आली आहे. वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्यावी. बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने दुसर्यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका !’ असे ट्वीट करत शेलारांनी म्हटले.