‘देवेंद्र फडणवीस तुमचे संस्कार तुमच्याजवळ ठेवा’, चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक
VIDEO | चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असं का म्हणाले?
मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली. दरम्यान, या आक्षेपार्ह टीकेवरून भाजप चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मी राज्याचा अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना सांगतोय. आज तुम्हाला शेवटची संधी दिलीय. यानंतर बोललात तर लक्षात ठेवा. धमकी म्हणून समजा. यानंतर तुम्ही आमच्या नेत्याला बोलायचं नाही. तुम्हाला तो अधिकार नाही.”, असा इशार बावनकुळेंनी दिला आहे. तर पुढे ते असेही म्हणाले, की अशाप्रकारे टीका करणाऱ्यांना जशासतसे उत्तर द्या असे मी देवेंद्र फडणवीस यांना म्हटले. त्यावर ते म्हणतात माझ्यावर संस्कार आहेत. पण आता तेच तुमचे संस्कार देवेंद्रजी तुमच्याजवळ ठेवा आता आम्ही करू काय करायचं ते असे बावनकुळे म्हणाले.