सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर, अन् चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक विधान; चर्चा तर होणारच…
काँग्रेस वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मात्र या सर्व चर्चांना भाजपच्या बड्या नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे. यावर स्वत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे
सोलापूर, १७ जानेवारी २०२४ : प्रणिती शिंदेला आणि मला भाजपची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मात्र या सर्व चर्चांना भाजपच्या बड्या नेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे. यावर स्वत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. ‘भाजपकडून प्रणिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांना अशी भाजपकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या जात आहेत. भेट होणं ही गोष्ट वेगळी आहे. सुशीलकुमार शिंदे आणि माझी ही दोन-तीन वेळा भेट झाली आहे. पण ती गोष्ट वेगळी आहे.’, असे बावनकुळे म्हणाले तर कुणीही मोदीजींच्या नेतृत्वात भाजपचा दुपट्टा घालण्यास तयार असेल जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता नरेंद्र मोदी यांच्यात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडून अजितदादा भाजप बरोबर आल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले.