‘राहुल गांधी यांची बुद्धी फ्लाईंग किसकडे जातेय’; चित्रा वाघ यांची घणाघाती टीका
त्यानंतर त्यांच्याकडून भाषणादरम्यान फ्लाईंग किस गेली असा आरोप केला जात आहे. तर या प्रकरणी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह भाजपच्या २२ महिला खासदारांनी अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. आता हे प्रकरण चांगलेच तापलेलं असून राज्यात देखील याचे पडसाद उमंटत आहेत.
मुंबई, 10 ऑगस्ट 2023 । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील फ्लाईंग किस प्रकरणावरून भाजप चांगलीत आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यांनी भाजपच्या एनडीएने भारत मातेची हत्या केली. ते हत्यारे आहेत असा प्रखर हल्ला चढवला. त्यानंतर त्यांच्याकडून भाषणादरम्यान फ्लाईंग किस गेली असा आरोप केला जात आहे. तर या प्रकरणी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह भाजपच्या २२ महिला खासदारांनी अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. आता हे प्रकरण चांगलेच तापलेलं असून राज्यात देखील याचे पडसाद उमंटत आहेत. यावरून भाजपच्या महिला आघाडीने मुंबईत जोरदार निदर्शने केली आहेत. तर भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि ठाकरे गटावर निशाना साधला आहे. तर या फ्लाईंग किसला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे समर्थन आहे का? असा सवाल केला आहे. पाहा काय टीका केलीय चित्रा वाघ यांनी…