Ajit Pawar यांना सरकारमधून काढून टाकण्यासाठी शरद पवार यांचे प्रयत्न सुरू? भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
VIDEO | 'अजित पवार यांना अडचणीत आणायचे, आणि सरकामधून काढून पुन्हा राष्ट्रवादीत आणायचे असा कट शरद पवार यांचा असल्याची खात्रीलायक माहिती माझ्याकडे आहे', भाजपच्या कोणत्या नेत्यानं केला मोठा दावा?
नागपूर, ५ सप्टेंबर २०२३ | अजित पवार यांना अडचणीत आणायचे आणि सरकारमधून काढून पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी शरद पवार यांचे प्रयत्न सुरू असल्याचे खात्रीलायक माहिती आहे. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रालयावर खोटा आरोप शरद पवार यांच्या सांगण्यावरून केला आहे, अशी टीका भाजप नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. गृहीमंत्री असताना अनिल देशमुख यांना, अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके कोणी आणले, सचिन वझे, हा वसुली करतो हे त्यांना कळलं नाही, त्याचे अधिकारी सिरियसली घ्यायचे नाही मग आता ते गृहमंत्री नसताना त्यांना कसं कळलं? हे सर्व कटकारस्थान शरद पवार यांच्याकडूनच केले जात आहे. अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करा, सत्य सर्व समोर येईल अशी मागणीही आशिष देशमुख यांनी केली.

खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा

‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?

धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं

पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
