भाजप नेत्यानं राष्ट्रवादीच्या आमदाराची अक्कलच काढली; म्हणाले, “... डोकं तपासायला लागणार”

भाजप नेत्यानं राष्ट्रवादीच्या आमदाराची अक्कलच काढली; म्हणाले, “… डोकं तपासायला लागणार”

| Updated on: May 30, 2023 | 9:51 AM

VIDEO | गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात वार-पलटवार सुरूच, आता वादाचं कारण काय?

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात नेहमीच वादाची ठिणगी पडत असते. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. ही टीका अनेकवेळा पातळीसोडून केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची ईडी आणि सीबीआयची चौकशी लावल्यामुळे, एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर मेक्का लावला असल्याचे जाहिर वक्तव्य केले होते. त्यामुळे खडसे आणि महाजन यांच्यात वादाची ठिणगी पडली. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. ते म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून वाटेल त्या प्रकारची टीका करत असतात. त्यामुळे सध्या एकनाथ खडसे यांचे डोकं तपासायला लागणार आहे. मला तुम्ही जास्त बोलायला लावू नका, मी तोंड उघडलं तर लोकं तुमच्या तोंडाला काळ लावतील असा त्यांनी इशाराही त्यांना दिला आहे. एकनाथ खडसे यांनीही पलटवार केला आहे. माझं डोकं ठिकाणावर आहे, तुम्ही चिंता करू नका आधी या सरकारचं डोकं ठिकाणावर आणा असा सल्ला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिला आहे.

Published on: May 30, 2023 09:51 AM