ACP Sushsma Chavhan | गिरीश महाजनांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता?
पुणे पोलिसांनी कागदपत्र जप्त करत पुण्याला आणली आहेत. पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेसंदर्भातल्या वादातून महाजन आणि भोईटे यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता.
पुणे: जळगावच्या मराठा विद्याप्रासारक संस्थेशी निगडीत वादातून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. पुणे पोलिसांनी जळगावमध्ये काही ठिकाणी छापे टाकले होते. पुणे पोलिसांनी या प्रकरणी जळगावातून टेम्पो भरून कागदपत्र जप्त केली आहेत. पुणे पोलिसांना यांना या प्रकरणात मोठं लीड मिळण्याची शक्यता असल्यानं भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, असं कळतंय. जळगावला गिरीश महाजन यांच्यविरोधात नोंदवण्यात आलेल्या संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरून कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांनी कागदपत्र जप्त करत पुण्याला आणली आहेत. पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात जळगाव मराठा शिक्षण प्रसारक संस्थेसंदर्भातल्या वादातून महाजन आणि भोईटे यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता.