Gopichand Padalkar : त्यांची सावली पडली अन् माती झाली, गोपीचंद पडळकर यांचा कुणावर निशाणा?
VIDEO | अदृश्य शक्तींकडून महाराष्ट्राचा खेळखंडोबा झालाय, राज्यातील सरकार आणि केंद्रातील सरकारमध्ये अदृश्य शक्ती असल्याची टीका वारंवार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून केल्याचे पाहायला मिळाले, सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर गोपीचंद पडळकर यांनी सडकून टीका केली
बुलढाणा, १४ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून राज्यात आणि केंद्रातील सरकारमध्ये अदृश्य शक्ती असल्याचे म्हटले होते. इतकेच नाहीतर ही अदृश्य शक्ती असणार सरकार विरोधकांना संपावायला निघालं असल्याची टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली होती. वारंवार सुप्रिया सुळे यांच्याकडून अदृश्य शक्तीचा उल्लेख होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतीच सुप्रिया सुळे यांनी अदृश्य शक्तींकडून महाराष्ट्राचा खेळखंडोबा झाल्याचे वक्तव्य केले होतं. या टीकेवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे यांना जवळचा चष्मा लागलेला आहे. तर शरद पवार यांची सावली ज्यांच्यावर पडली त्यांची माती झाली असल्याची टीकाही गोपीचंद पडळकर यांनी केली.
Published on: Oct 14, 2023 05:45 PM
Latest Videos