विरोधक काहीही बोलतात, सविस्तर माहिती घेऊन बोलू : पडळकर
शेतकऱ्यांचा हा डाटा गोळा करत असताना त्यांच्या जातीचा डाटाकडून गोळा करून निवडणुकीसाठी तो वापरायचा आहे का? असा सवाल उपस्थित केला होता
मुंबई : खतं घेण्यासाठी केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी ई पास मशिन तयार करण्यात आलं आहे. त्यात माहिती भरताना जात टाकावी लागते. यावरून काँग्रेसचे विधान परिषद गटनेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकावर सडकून टीका केली आहे. तसेच हा शेतकऱ्यांचा हा डाटा गोळा करत असताना त्यांच्या जातीचा डाटाकडून गोळा करून निवडणुकीसाठी तो वापरायचा आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी असा काही प्रकार नसतो. पण असं काही झालेलं मला माहित नाही. योग्य माहिती घेऊन बोलतो असं म्हटलं आहे. तर निवडणुकीसाठी या देशांमध्ये, राज्यामध्ये आणि वेगळी व्यवस्था आहे. राज्यात जवळपास 12 कोटी आपली लोकसंख्या असून शेतकऱ्यांची संख्या एक कोटी पंधरा लाख आहे. त्यामुळे विरोधक काहीही बोलतात.
Published on: Mar 10, 2023 12:43 PM
Latest Videos