पूर्वी 'मातोश्री'त हिंदुत्व नावाचे पीठ चालायचं, आता तिथे 'मातोश्री' नावाची 'मशीद' झालीय; कुणाची खोचक टीका

पूर्वी ‘मातोश्री’त हिंदुत्व नावाचे पीठ चालायचं, आता तिथे ‘मातोश्री’ नावाची ‘मशीद’ झालीय; कुणाची खोचक टीका

| Updated on: Jan 16, 2024 | 4:10 PM

बीजेपी पीठ तयार झालं आहे यावरून संजय राऊत यांनी टीका केली यावर बोलताना नितेश राणे यांनी राऊतांवर पलटवार केलाय. कलानगर जामा मशिदीनंतर आता मुंबईत नवी मातोश्री नावाची मशीद तयार झाली आहे. जिथे उद्धव ठाकरे नावाचा मुल्ला इमाम बसतो अशी जिव्हारी लागणारी टीका नितेश राणेंनी केली

मुंबई, १६ जानेवारी २०२४ : अयोध्येतील राम मंदिरावरून नको ते दावे करून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहे, असा हल्लाहोल भाजप नेते नितेश राणे यांनी केला. तर बीजेपी पीठ तयार झालं आहे यावरून संजय राऊत यांनी टीका केली यावर बोलताना नितेश राणे यांनी राऊतांवर पलटवार केलाय. कलानगर जामा मशिदीनंतर आता मुंबईत नवी मातोश्री नावाची मशीद तयार झाली आहे. जिथे उद्धव ठाकरे नावाचा मुल्ला इमाम बसतो अशी जिव्हारी लागणारी टीका नितेश राणेंनी केली. मातोश्रीनंतर आता दुसरी मातोश्री दर्गा म्हणून उभी राहिली आहे. पूर्वीच्या मातोश्रीत हिंदुत्वाचे पीठ म्हणून बाळासाहेबांचे काम चालायचं मात्र आता तिथे जामा मशीदनंतर मातोश्री नावाची नवीन मज्जिद उभी राहिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईच्या ओशिवरा परिसरामध्ये भाजप नेते संजय पांडे यांच्या प्रयत्नातून आणि भाजपाच्या वतीने 50 फुटी राम मंदिराची प्रतिकृती बनवण्यात येत आहे. भाजप नेते, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या मंदिराच्या प्रतिकृतीच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी नितेश राणे बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

Published on: Jan 16, 2024 04:10 PM