सुषमा अंधारे यांना भाजप नेत्यानं पुन्हा डिवचलं; म्हणाले, ‘फुसका बॉम्ब…’
VIDEO | भाजप नेत्याची जीभ पुन्हा घसरली! ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले बघा
मुंबई : शिवसेनेत प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्याच बनल्या आहेत. शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर त्या जोरदार टीका करत असल्याने बऱ्याचदा त्या चर्चेत असतात. अशातच सुषमा अंधारे यांची तुलना सिने अभिनेत्री राखी सावंत हिच्याशी केली असून जहरी टीका केली आहे. दोघी बहिणी बहिणी असून एकमेकींच्या प्रतिस्पर्धीदेखील आहेत, असं वक्तव्य भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा याच भाजप नेत्यानं सुषमा अंधारे यांनी डिवचल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस हे काडतूस असतील तर उद्धव ठाकरे हे तोफ आहेत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. सुषमा अंधारे यांच्या या टीकेला मोहित कंबोज यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
Published on: Apr 07, 2023 02:06 PM
Latest Videos