मनोज जरांगे पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यावर नितेश राणे यांनी दिला सल्ला, म्हणाले...

मनोज जरांगे पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे यांनी दिला सल्ला, म्हणाले…

| Updated on: Oct 02, 2023 | 10:02 AM

VIDEO | मनोज जरांगे पाटील हे सध्या विविध भागात दौरा करत आहे. राज्यव्यापी दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. जरांगे पाटील यांच्या वक्तव्यानंतर नितेश राणे यांनी त्यांना सल्ला दिला. तर या सल्ल्यावर पुन्हा जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | राज्यव्यापी दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. छगन भुजबळ यांना बळ द्यायचं काम मराठा समाजाने करू नये, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथे केलं होतं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख केला असल्याचेही पाहायला मिळाले. तर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी टीका करत बसू नये, तर आरक्षणावर लक्ष देण्याचा सल्ला नितेश राणे यांनी दिला आहे. नितेश राणे यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर माझा सगळा फोकस मराठा आरक्षणावरच असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले आणि त्यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

Published on: Oct 02, 2023 10:02 AM