सुशीलकुमार शिंदे हे प्रणिती शिंदेंना भाजपमध्ये पाठवणार?; कोणत्या नेत्याचा दावा?
सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. सुशीलकुमार शिंदे यांना आपली मुलगी २०२४ मध्ये परत निवडून येणार नाही, अशी शाश्वती असेल, असे म्हणत नितेश राणे यांनी हल्लाबोल केलाय.
मुंबई, १७ जानेवारी २०२४ : माझा दोन वेळा पराभव झाला आहे. तरीही प्रणितीताई शिंदेला आणि मला भाजपची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अक्कलकोटमधील एका कार्यक्रमात केला. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. सुशीलकुमार शिंदे यांना आपली मुलगी २०२४ मध्ये परत निवडून येणार नाही, अशी शाश्वती असेल, असे म्हणत नितेश राणे यांनी हल्लाबोल केलाय. पुढे असेही म्हणाले की, तसं पाहायला गेलं तर काँग्रेसचं आता दुकानचं बंद झालं आहे. म्हणून प्रणिती शिंदे यांना अप्रत्यक्षरित्या भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे. तर चांगल्या लोकांसाठी पक्षाची दारं कधीही खुली असतात. अनेकांना आम्हीही ऑफर देत असतो. एकत्र येऊन सगळे महाराष्ट्राचा विकास करू, पण असं म्हणणं जर काही लोकांना गैर वाटत असेल तर तो त्यांचा विचार आहे परंतु या महाराष्ट्राच्या जडण-घडणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा, ही त्यामागची भूमिका असल्याचे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
