Pankaja Munde | पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोना लागण
पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्या आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वेगानं सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यातच नेतेमंडळीही मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. आता भाजप नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्या आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली आहे. त्या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
Latest Videos