‘घर कोंबड्यासारखं मातोश्रीत बसून राहिलेल्यांनी फडणवीस यांची लायकी काढू नये’, उद्धव ठाकरे यांच्यावर कुणाचा पलटवार?
VIDEO | 'देवेंद्र फडणवीस यांच्या विषयीचा द्वेष आणि मस्तर उद्धव ठाकरेंच्या नसानसात भरलेला', उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांचं प्रत्युत्तर, बघा काय केला पलटवार
मुंबई, ५ सप्टेंबर २०२३ | ‘देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या आसपासही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत’, असे म्हणत मराठा आरक्षणाच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या विषयीचा द्वेष आणि मस्तर उद्धव ठाकरेंच्या नसानसात भरलेला आहे त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करतात. फडणवीस यांची क्षमता त्यांचा आवाका त्यांचा ज्ञान हे महाराष्ट्राला माहित आहे. उद्धव ठाकरेंची लायकीही महाराष्ट्राला माहित आहे. अडीच वर्ष जे मंत्रालयात गेले नाही, शासन समजून घेतलं नाही, घर कोंबड्या सारखं मातोश्रीत बसून राहिले त्यांनी दुसऱ्यांची लायकी काढू नये, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळातील किंवा संसदीय कारकीर्द आणि उद्धव ठाकरेंची कारकीर्द हे पाहिल्यावर देवेंद्र फडणवीस यांची काय कारकीर्द आहे हे लक्षात येतं. परंतु द्वेषाने बोलायचं हेच उद्धव ठाकरेंना जमतं. तुम्ही आत्ता कुठे विधान परिषदेवर आमदार म्हणून गेलेत आणि फडणवीस हे बऱ्याच वेळेला आमदार म्हणून आलेले आहेत. उद्धव ठाकरे हे ज्ञानी पंडित आहेत त्यांना आघात ज्ञान आहे असेच आता म्हणावं लागेल