AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Satpute : 'मारकडवाडी इव्हेंटचा खरा मास्टर माईंड तर...', भाजपच्या राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव

Ram Satpute : ‘मारकडवाडी इव्हेंटचा खरा मास्टर माईंड तर…’, भाजपच्या राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव

| Updated on: Dec 08, 2024 | 3:07 PM

शरद पवारांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांचं कौतुक केलं. यासंदर्भात भाजप नेते राम सातपुते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या गावात फेरनिवडणूक तेही बॅलेट पेपरवर घेण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, यावरुनच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संताप व्यक्त करत आज मारकडवाडी गावाला भेट दिली. यावेळी शरद पवारांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांचं कौतुक केलं. यासंदर्भात भाजप नेते राम सातपुते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवारांची येथे सभा झाली तेव्हा ३४९ लोकं होते. जर देशाचे नेते म्हणून त्यांच्या सभेला इतकेच लोकं येत असतील तर त्यांनी राजकारणात काय करायचे याचा विचार करायला पाहिजे.’, असे म्हणत राम सातपुते यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, आज मारकडवाडी येथे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या लोकांनी शिवीगाळ केली. याचा निषेध राम सातपुते यांनी व्यक्त केला. लोकशाहीत सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण जर लोकांच्या आवश्यक गरजांवर बोलताना रणजितसिंग मोहिते पाटील धमक्याची भाषा करत असतील तर ते शोभतं का? त्यांच्यात हिंमत असेल तर भाजपच्या विधानपरिषदेचा राजीनामा द्या, अशी आक्रमक मागमी राम सातपुते यांनी केली. ते पुढे असेही म्हणाले, उत्तम जानकर हा केवळ एक प्यादं आहे. मात्र मारकडवाडी इव्हेंटचा खरा मास्टर माईंड तर रणजितसिंग मोहिते पाटील हा आहे, असं म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Published on: Dec 08, 2024 03:06 PM