आयोग बरखास्त करून संजय राऊत यांना बसवायचं का? उद्धव ठाकरे यांच्यावर ‘या’ नेत्यानं केली सडकून टीका
VIDEO | केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर कुणी साधला निशाणा, बघा व्हिडीओ
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे चोरांच्या हाती दिले आहे. निवडणूक आयोग विकले गेले आहे. शिवसेना पक्षाविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा, पक्षपाती असल्याने हा आयोग बरखास्त केला पाहिजे आणि प्रत्यक्ष निवडणूका घेऊनच आयुक्त आणि आयोग नेमला पाहिजे, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीअशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर भाजप नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग बरखास्त करायचं म्हणताय तर त्या जागेवर संजय राऊत यांना नेमायच का..? असा खोचक सवालही रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तर 2024 ची निवडणूक शेवटची असल्याचे उद्धव ठाकरे म्हटले होते, त्यावर बोलताना दानवे म्हणाले, उद्धव ठाकरेंचा बोलवता धनी कोण आहे ही गोष्ट लक्षात घ्या. हा देश लोकशाहीला मानणारा देश आहे. जो कोणता राजकीय पक्ष लोकशाहीला सोडून काम करेल त्याला जनता त्याची जागा दाखवेल. चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान देहूरोड मामुर्डी येथे रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे.