अजितदादा राष्ट्रवादीचे, राष्ट्रवादी अजितदादांची मग शरद पवार कुणाचे? भाजप नेत्याचा सवाल
VIDEO | 'तर येणाऱ्या काळात शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील', भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व्यक्त केला विश्वास इतकेच नाही तर अजितदादा राष्ट्रवादीचे, राष्ट्रवादी अजितदादांची मग शरद पवार कुणाचे?
चंद्रपूर, २५ ऑगस्ट २०२३ | अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. पहिल्या दिवसांपासून अजित पवार सांगताय, राष्ट्रवादीचे संघटन आणि कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहेत आणि माझं शरद पवार यांच्यासोबत नातं आहे, असे सांगतात. अजित पवार देखील शरद पवारांना नेतेच मानतात. नाते असल्याने विविध कामांसाठी भेटत असतात. त्यामुळेच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला असून देशाच्या वेगवान प्रगतीची धुरा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सांभाळू शकत असल्याची त्यांना जाणीव झाली आहे. अजितदादा राष्ट्रवादीचे, राष्ट्रवादी अजितदादांची मग शरद पवार कुणाचे? असा सवाल उपस्थित करत सुधीर मनगंटीवार म्हणाले, त्यामुळेच आता शरद पवार कोणाचे हे येत्या काळात दिसेलच अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मनगंटीवार यांनी दिली आहे.
Published on: Aug 25, 2023 09:16 PM
Latest Videos