‘डोक्यावर परिणाम, संजय राऊत लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये…’, कुणी दिला इशारा?
देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोप आता भाजप सहन करणार नाही. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांनी खोटे आरोप करू नयेत नाही तर त्यांना पुण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करू असा इशारा भाजपने दिलाय.
पुणे : 5 ऑक्टोबर 2023 | महाराष्ट्रातील असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांना महाराष्ट्राची जनता पारदर्शक नेते म्हणून बघतात. दिलेल्या शब्दाला जगणारे नेते असे देवेंद्आर फडणवीस आहेत. केवळ राजकारणासाठी संजय राऊत त्यांच्यावर टीका करतात. फडणवीस यांच्यावर टीका करण्याची त्याची योग्यताही नाही. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रोज खोटे बोलून यातून प्रसिद्धी मिळवणे हाच कार्यक्रम सुरु आहे. त्यांना पाहिलं की लोक चॅनेल बदलतात. जनता त्यांना पूर्णपणे ओळखून आहे. जनता वैतागली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरील खोटा आरोप सहन करणार नाही. यापुढे ते काही बोलले तर त्यांना पुण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भाजप पुणे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिलाय.
Published on: Oct 05, 2023 10:08 PM
Latest Videos