बारामतीच नाही, महाराष्ट्रात 48 टार्गेट, कोल्हापुरातून भाजप नेत्याचं वक्तव्य!
महाराष्ट्रातील 48 जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण ज्या जागा आम्ही कधीच जिंकल्या नाहीत, त्यावर जास्त लक्ष देत आहोत, असं माधव भंडारी म्हणालेत.
कोल्हापूरः आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) फक्त बारामतीच नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागांवर विजय मिळवण्याचं भाजपचं (BJP) टार्गेट आहे, असं वक्तव्य भाजप नेते माधव भंडारी यांनी कोल्हापुरात केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त देशभरात त्यांनी काय बदल केले, हे सांगण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी कोल्हापुरात भाजप नेते उपस्थित होते. यावेळी माधव भंडारी यांनी बारामती येथील निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याबद्दल वक्तव्य केलं. महाराष्ट्रातील 48 जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण ज्या जागा आम्ही कधीच जिंकल्या नाहीत, त्यावर जास्त लक्ष देत आहोत, असं माधव भंडारी म्हणालेत.
Published on: Sep 23, 2022 03:10 PM
Latest Videos