निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची बैठक; मनसेसोबत युतीवर चर्चा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची बैठक; मनसेसोबत युतीवर चर्चा

| Updated on: Jan 25, 2022 | 8:12 PM

जसजशी महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे. तसतसे विविध पक्ष युती, आघाड्यांची गणिते मांडताना दिसत आहे. दरम्यान आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मनसेसोबत युती करायची की नाही यावर चर्चा झाली.

मुंबई : जसजशी महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे. तसतसे विविध पक्ष युती, आघाड्यांची गणिते मांडताना दिसत आहे. दरम्यान आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मनसेसोबत युती करायची की नाही यावर चर्चा झाली. या बैठकीत काही नेत्यांनी मनसे सोबत युती करावी असे मत मांडले. मात्र अनेकांनी त्यामुळे भाजपाचे नुकसान होऊ शकते, अशी देखील शक्यता वर्तवली आहे. मनसेच्या उत्तरभारतीय भूमिकेचा फटका हा भाजपाला बसू शकतो. असे या नेत्यांचे मत आहे. त्यामुळे भाजप आगामी निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचे संकते मिळत आहेत.