अनिल जयसिंघानीया अटकेप्रकरणी अतुल भातखळकर यांनी स्पष्टच सांगितलं अन् दिला इशारा
VIDEO | देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अडकवण्याचा प्रकार हा निंदनीय प्रयत्न असल्याची खंत अतुल भातखळकर यांनी व्यक्त करत दिला इशाला
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वीच अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात एक एफआयआर दाखल झाला होता आणि ते गेले काही दिवस फरार होते. मुंबई पोलिसांनी त्या गुन्ह्याच्या संदर्भात कदाचित त्यांना अटक केली असावी. त्यांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडवी.’ दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात काही राजकीय नेते सुद्धा सहभागी असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना भातखळकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी असा कुठलाही आरोप केला नव्हता. पेपरमध्ये बातमी आल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी त्या संदर्भात सदनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्याला त्यांनी उत्तर दिले आहे आणि चौकशीमध्ये कोणाचे कोणाबरोबर फोटो आहेत का आहेत ते सगळे चौकशीची अखेरीस समोर येईल, असेही त्यांनी म्हटले.