पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निवडणूक आयोग गुलाम नाही तर…, अतुल भातखळकर यांचा जोरदार पलटवार
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्यावर का आली दुर्दशा ? बघा काय सांगितले भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी कारण
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं काल शिवेसना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव हे दोन्ही शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मातोश्रीबाहेरून उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यालाच प्रत्युत्तर देत भाजप आमदार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. निवडणूक आयोग नरेंद्र मोदी यांचा गुलाम नाहीये, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादीचे गुलाम झालात उद्धव ठाकरे म्हणून तुमच्यावर ही पाळी आली आहे. तुम्ही शिवसेनेचे चिन्ह, पक्ष, विचार हे सगळं सोनिया सेनेच्या चरणी अर्पण केलं म्हणून तुमची ही आज दुर्दशा झाल्याची टीका देखील अतुल भातखळकर यांनी केली आहे.