प्रस्थापितांना देऊ उत्तर, OBC शंभरात सत्तर; गोपीचंद पडळकर यांचा एल्गार
मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातच ओबीसींची महाएल्गार सभा आज झाली. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एल्गार सभा झाली. यावेळी भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळवकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘प्रस्थापिताना देऊ उत्तर, कारण ओबीसी शंभरात सत्तर’, अशी नवी घोषणा पडळकरांनी दिली.
जालना, १७ नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्धार कायम ठेवत आता राज्यव्यापी दौरा सुरू केलाय. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातच ओबीसींची महाएल्गार सभा आज झाली. यावेळी भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळवकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या भाषणाची सुरूवात करताना गोपीचंद पडळकर यांनी ‘प्रस्थापिताना देऊ उत्तर, कारण ओबीसी शंभरात सत्तर’, अशी नवी घोषणा दिली. आपल्या भाषणातून पडळकर म्हणाले, ओबीसींची ही सभा पाहून ओबीसीच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे. देशात ओबीसी आरक्षणासाठी अनेक आंदोलने उभी राहिली, त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळाले. या आरक्षणात काटे आणण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांना सरळ करण्याचे काम या ओबीसींमध्ये आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.