पडळकर यांची पुन्हा एकदा पवार यांच्यावर टीका; एसटी बँकेवरून केले गंभार आरोप
विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पलटवार केला. याच दरम्यान आता पुन्हा एकदा पडळकर यांनी पवार यांच्यावर एसटी बँक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. तर पवार यांनी एसटी बँक लुटली असा आरोप केला आहे.
बीड : काही तासांच्या आधीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. त्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पलटवार केला. याच दरम्यान आता पुन्हा एकदा पडळकर यांनी पवार यांच्यावर एसटी बँक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. तर पवार यांनी एसटी बँक लुटली असा आरोप केला आहे. पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांच्या बीडमधील एका कार्यक्रमात बोलत होते. ते एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट बँक मुंबई लिमिटेडच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी त्यांनी हा हल्ला चढवताना, इतके वर्ष त्यांच्या संघटनेच्या ताब्यात दिली. मात्र त्यांनी काय केलं? काय दिवं लावली? लुटूनखाली बँक. तर ड्राव्हर आणि कंडक्टर यांची कर्जाच्या नावाखाली पिळवून होते असा घणाघात केला आहे.
Published on: Jun 06, 2023 10:04 AM
Latest Videos