‘जिहादी-तिरंग्याचा काय संबंध…’, इम्तियाज जलील यांच्यावर नितेश राणेंचा निशाणा
छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत आज तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली आहे. आज तिरंगा संविधान रॅली माजी खासदार, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आणि त्यांच्या समर्थकांकडून काढण्यात आली आहे. यावर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
कोणीही मुस्लिमांबद्दल बोलतात, कारवाई होणार की नाही? असा सवाल इम्तियाज जलील यांनी सरकारला केलाय. इतकंच नाहीतर इम्तियाज जलील यांनी महंत रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्या अटकेची देखील मागणी केली आहे. दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या तिरंगा संविधान रॅलीवर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. इम्तियाज जलील यांच्या रॅलीला भीक घालत नाही, असे नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. तर यासोबत महंत रामगिरी महाराज यांनीही इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधत आमदारकीसाठी जलील यांची ही राजकीय रॅली असल्याची टीका केली आहे. ‘जिहादी आज मुंबईमध्ये जमतायंत त्यांचा आणि तिरंग्याचा काय संबंध हे आधी त्यांनी सांगावं’, असा सवाल नितेश राणेंनी केला. तर गणेश चतुर्थीनंतर ज्या ईदला मोहम्मद पैंगबरांच्या रॅली, जुलूस झाले. त्यामध्ये पॅलेस्टाइनचे झेंडे कसे फडकवले गेले? त्याचा निषेध कोणी केला का? हिंदूंनी आपल्या देशात सण साजरे करायचे नाहीत का? असा सवाल नारायण राणे यांनी करत जलील यांच्या रॅलीला भीक घालत नाही, असे म्हणत सडकून टीका केली.