उद्धव ठाकरे यांचा 'या' भाजप नेत्यानं केला 'जनाब' असा उल्लेख, काय आहे कारण?

उद्धव ठाकरे यांचा ‘या’ भाजप नेत्यानं केला ‘जनाब’ असा उल्लेख, काय आहे कारण?

| Updated on: Mar 04, 2023 | 7:11 PM

VIDEO | 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नगरीत औरंग्याचे उदात्तीकरण', भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

मुंबई : एमआयएचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध केला आहे. तर औरंगाबादच्या नामांतराचा विरोध करण्यासाठी त्यांनी आज उपोषण सुरु केलंय. जलील यांच्या आंदोलनात काही आंदोलकांनी थेट औरंगजेबाचा फोटो झळकावला. पण कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही. या प्रकाराबाबत भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘संभाजी नगरमध्ये एमआयएमच्या सभेत औरंगजेबाचे फोटो उडवणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नगरीत औरंग्याचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे’, असे म्हणत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत जोरदार टीका केली आहे. ते पुढे असेही म्हणाले की, हिंदुस्थानातली ही परिस्थिती, हिंदू विरोधातली ही परिस्थिती याबाबत जनाब उद्धव ठाकरे बोलणार आहेत का? की याचे उत्तर आम्हालाच हिंदू म्हणून द्यावे लागेल, असा सवालही भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

Published on: Mar 04, 2023 07:11 PM