प्रसाद लाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
VIDEO | भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्याबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय शिरसाट म्हणाले, '...एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री'
छत्रपती संभाजीनगर, २३ सप्टेंबर २०२३ | भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय. 2024 ला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, तर भाजपच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सरकार स्थापन होणार असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे. शिरसाट म्हणाले, ‘प्रसाद लाड हे भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे असे म्हणणे काही चुकीचे नाही. प्रसाद लाड यांनी त्यांच्या नेत्याचं नाव घेणं काही गैर नाही, आम्हालाही वाटतं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री रहावे. तर अजित पवार यांच्या गटाला वाटतं की, अजित पवार मुख्यमंत्री होतील’, असे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, राजकारणात प्रत्येक पक्षाचा जो कार्यकर्ता असतो, त्याला निश्चितच असं वाटत असतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रसाद लाड यांच्या मते, आमचंही म्हणणं आहे की, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करत आहेत, पुढील वेळेला तेच मुख्यमंत्री राहावेत, अशी आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी यावेळी दिली.