सुजय विखे पाटील यांचा रोहित पवार यांना पाठिंबा? राम शिंदे यांच्या ‘त्या’ आरोपांवर काय म्हणाले…
VIDEO | भाजप आमदार राम शिंदे यांच्या 'त्या' आरोपांवर सुजय विखे यांचं उत्तर, बघा काय म्हणाले...
अहमदनगर : अहमदनगरमधील जामखेड येथे बाजार समितीची निवडणूक झाली. यामध्ये भाजपचा सभापती निवडणून आला. यानंतर भाजप आमदार राम शिंदे यांनी सुजय विखे यांचा रोहित पवार आणि राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप केला. मात्र या आरोपांवर खासदार सुजय विखे पाटील यांनी भाष्य करत हा आरोप फेटाळून लावल्याचे पाहायला मिळाले. आमदार राम शिंदेंनी जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींजवळ भूमिका मांडावी. त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. पक्षाच्या चौकटीत राहून यासंदर्भात चर्चा करण्याची आवश्यकता आहे. अशा वक्तव्याने विनाकारण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. राम शिंदेंनी जाहीरपणे मतप्रदर्शन टाळलं पाहिजे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनीही सल्ला दिलाय, गटबाजी काहीही नाही. खासदार बाळासाहेब विखेंनी चाळीस वर्ष अहमदनगर जिल्ह्याचं नेतृत्व केलं. आमच्यावर पहिल्यापासून हेच आरोप झाले. या विषयावर अधिक भाष्य करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींसमोर शहानिशा झाली पाहिजे, असे सुजय विखे पाटी यांनी म्हटलं तर भविष्यकाळात असे आरोप होऊ नये म्हणून पक्षांमध्ये आचारसंहिता असावी, असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम

पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच

'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'

...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
