Suresh Dhas : ‘आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे अन्…’, सुरेश धस यांचा आक्रोश
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आक्रोश आंदोलनं होतांना दिसताय. अशातच आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी राज्यभरात आक्रोश आंदोलनं होतांना दिसताय. अशातच आज संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनात भाजप आमदार सुरेश धस हे देखील सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. आजच्या आंदोलनात देखील त्यांनी मोठी मागणी केली आहे. कितीही वेळ जाऊ द्या संतोष देशमुख यांना मनातून उतरू देऊ नका. कितीही वेळ लागला तरी चालेल, आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळून देऊ, असं सुरेश धस म्हणाले तर आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे, असं म्हणत सुरेश धस यांनी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये एकच आक्रोश केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, सरपंच परिषदेतील आक्रोश राज्यभरात पोहोचला पाहिजे. अंतुलेनंतर फडणवीस हेच पहिले असे मुख्यमंत्री आहेत की जे सरपंचांच्या मागण्यांकडे लक्ष देत आहेत, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.