‘जागृत लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना बघत होतो’: जयंत पाटील
बापट यांनी विधानसभा, लोकसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या कामाची पद्धत त्यांची अतिशय सुंदर होती. तर एक अतिशय जागृत लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्याकडे बघत असू
पुणे : राज्यातील भाजपसह पुण्याच्या राजकारणाचे भिष्माचार्य मानले जाणारे भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले खासदार गिरीश बापट यांचे 73 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने पुण्यासह राज्यातील राजकीय नेत्यांना धक्का बसला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त करताना त्यांना श्रद्धांजली दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील बापट यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
बापट यांनी विधानसभा, लोकसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या कामाची पद्धत त्यांची अतिशय सुंदर होती. तर एक अतिशय जागृत लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्याकडे बघत असू. आज ते आपल्यातून गेलेले आहेत, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो असे जयंत पाटील म्हणाले.