‘आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 50 जागा जास्त दिसतील’, कुणी व्यक्त केला विश्वास?
VIDEO | 'पुढची १० वर्ष राज्यात आणि क्रेंदात भाजपची सत्ता कायम राहील असा विश्वास व्यक्त करत पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या टर्मसाठी मी तयार', भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला विश्वास
सोलापूर, २८ ऑगस्ट २०२३ | सत्तेच्या विरोधात काँग्रेसचे आमदार खासदार राहूच शकत नाहीत. आमदार खासदारांमध्ये मोठी अस्वस्थता असून मला खासगीमध्ये बोलावून दाखवली आहे, असल्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले तर या अस्वस्थतेतूनच काँग्रेस पक्ष फुटणार असून सध्या काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला ५० जागा नक्कीच वाढलेल्या दिसतील. पुढची १० वर्ष राज्यात आणि क्रेंदात भाजपची सत्ता कायम राहील. इतकंच नाही तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आगामी लोकसभेवर भाष्य करताना म्हणाले की, पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या टर्मसाठी मी तयारच असून पुढच्या निवडणुकीत माढ्याच्या आमदार शिंदे बंधुनी मला निवडून आणण्याकरता सिंहाचा वाटा उचलला असून पक्षाकडून जो आदेश येईल तो मान्य असल्याचे म्हणत विश्वास व्यक्त केला.