Sambhaji Raje Live | राष्ट्रपतींच्या भेटीनंतर खासदार संभाजीराजे आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले ?
मराठा आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रपतींसमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज आणि समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही भेट घेण्यात आली. संभाजीराजेसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सविस्तर निवेदन राष्ट्रपतीना दिलेलं आहे.
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मराठा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांचं एक शिष्टमंडळ होते. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप नेत्यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रपतींसमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज आणि समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही भेट घेण्यात आली. संभाजीराजेसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सविस्तर निवेदन राष्ट्रपतीना दिलेलं आहे.
Latest Videos