राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेत्याची बोचरी टीका, म्हणाले, ‘इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन’
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. तर पाऊस किती झाला याची आकडेवारीच त्यांनी दाखवली होती. तर याचमुद्द्यावरून शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली होती. त्यावरून भाजपने प्रखर टीका केली आहे.
मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याची टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाज कशी वाटत नाही असा सवाल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. तर पाऊस किती झाला याची आकडेवारीच त्यांनी दाखवली होती. तर याचमुद्द्यावरून शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली होती. त्यावरून भाजपने प्रखर टीका केली आहे. भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करत राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. तर राऊत आणि आदित्य ठाकरे यांना तमाशामधील आबुराव आणि बाबुराव असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी, तमाशामधील आबुराव आणि बाबुराव हे एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात असं म्हटलं आहे.
तर उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत त्यांनीतर काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली. म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला 400 mm पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात 400 mm? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. तर मुंबईत 26 जुलै 2005 ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता. यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर असल्याची घणाघाती टीका केली आहे. तर मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना…
इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन
वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!