मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, अजितदादांसोबत राणे अन् सोमय्यांचे उडाले खटके

मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, अजितदादांसोबत राणे अन् सोमय्यांचे उडाले खटके

| Updated on: Sep 22, 2024 | 11:01 AM

भाजप नेते नितेश राणेंवरुन महायुतीत अजित पवार विरुद्ध नितेश राणे अशी शाब्दिक चकमक सुरु होती. आता त्यात किरीट सोमय्यांनीही उडी घेत मुस्लिम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, असं ठणकावलंय. म्हणजेच महायुतीत दादांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना सुरु झालाय.

गेल्या काही दिवसांपासून नितेश राणेंवरुन अजित पवारांसोबत खटके उडताना दिसतायत. भडकाऊ भाषणावरुन अजित पवारांनी आम्ही धर्मनिरपेक्ष आहेत, विशिष्ट समाजाबद्दल बोललेलं चालणार नाही असं म्हटलंय. तर किरीट सोमय्यांनी मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, असा इशाराच अजित पवारांना दिला. तर भाजपच्या नितेश राणेंवरुन स्वत: अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीनं उघडपणे मोर्चा उघडलाय. आम्ही धर्मनिरुपेक्ष आहोत. विशिष्ट समाजाला बोलाल तर चालणार नाही, असा दमच अजित पवारांनी दिला. तर सुनिल तटकरेंनीही बेताल वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंचाही विरोधी करणारी राष्ट्रवादी असल्याचं म्हटलंय. हिंदू जनआक्रोश मोर्चातून नितेश राणे उघडपणे मुस्लिम उल्लेख करुन भडकाऊ भाषण करतायत. मात्र महायुतीतून अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हाला हे चालणार नाही असं म्हटलंय. अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांकडेही तक्रार केली. बघा संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 22, 2024 11:01 AM