Special Report : भाजपच्या नाराजीने मुंडे बहिण भाऊ आले जवळ? नाराजीनाट्यावर धनंजय मुंडे यांचा सल्ला
दिल्ली येथील जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी, ‘मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडीच आहे. काही नाही मिळाले तर जाईन ऊस तोडायला,’ अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट ऑफर देण्यात आली. यानंतर यावरून राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दोनच दिवसांपुर्वी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. दिल्ली येथील जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी, ‘मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडीच आहे. काही नाही मिळाले तर जाईन ऊस तोडायला,’ अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट ऑफर देण्यात आली. यानंतर यावरून राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी नाराज होणं न होण हा तिचा प्रश्न आहे. पण भाजप आता पहिल्या सारखा पक्ष राहिलेला नाही. तो आता सागरासारखा मोठा झाला आहे. भाजपचं नेतृत्व बदललं आहे. भाजपमध्ये नव्याने लोक आलेत त्यामुळे अशा परिस्थिती कुठं काय बोलावं? त्या बोलण्यानं नुकसान तर होणार नाही ना? याचा तिने विचार करायला हवा, जरा सबूरीनं घ्यायला हवं असा सल्ला धनंजय मुंडे दिला. त्यावरून आता मुंडे बहिण भाऊ जवळ आल्याचे तर त्यांच्यातील मतभेद कमी झाल्याचे दिसत आहे. यावर हा स्पेशल रिपोर्ट