मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास भाजपच्या OBC सेलचा विरोध, काय दिला इशारा?
VIDEO | मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास भाजपच्या ओबीसी नेत्यांनी विरोध. आज दुपारी कुणबी समाजाची बैठक आहे. त्यात आंदोलनाची दिशा ठरणार असून भाजप ओबीसी सेलचे कार्यकर्ते या आंदोलनात उतरणार
नागपूर, ८ सप्टेंबर २०२३ | मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास भाजपच्या ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. भाजपच्या ओबीसी सेलचे नेते नरेश बरडे यांनी हा विरोध दर्शवत आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे. तर “मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याला आमचा विरोध नाही. पण कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे”, अशी प्रतिक्रिया ओबीसी सेलचे नेते नरेश बरडे यांनी दिली आहे. आज कुणबी समाजाच्या बैठकीत भाजपचे नेतेही सहभागी होणार आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ आज सरकारला भेटणार असल्याने त्याचाही भाजप ओबीसी सेलकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. आज दुपारी कुणबी समाजाची बैठक आहे. त्यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे. भाजप ओबीसी सेलचे कार्यकर्ते या आंदोलनात उतरणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Published on: Sep 08, 2023 01:52 PM
Latest Videos