‘त्या नराधमांना चौकात शिक्षा…’, महिला अन् चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनांवर पंकजा मुंडे आक्रमक

भाजप नेत्या पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्यातल्या वलांडी इथे बोलत होत्या. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जन सन्मान यात्रा आयोजित केली होती. यामध्ये पंकजा मुंडे आज सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारावर बोलताना संताप व्यक्त केला.

'त्या नराधमांना चौकात शिक्षा...', महिला अन् चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनांवर पंकजा मुंडे आक्रमक
| Updated on: Aug 27, 2024 | 6:00 PM

बदलापूर येथील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केले. मुलींनी दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यास नकार दिला, यानंतर मेडिकल तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. या घटनेचा निषेध व्यक्त करत महिलांनी शाळेच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि शाळेच्या निषेधार्थ आपला रोष व्यक्त केला. तर शाळेच्या प्रशासनावर प्रकरण दाबल्याचा आरोप आहे. १२ आणि १३ ऑगस्टला शाळेत साडे ३ वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाले. लघुशंकेसाठी जाताना सफाई कर्मचारी आरोपी २२ वर्षीय अक्षय शिंदेकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या धक्कादायक घटनेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘पत्रकार जेव्हा मला महिला अत्याचारांच्या घटनांबाबत प्रश्न विचारतात तेव्हा खूप वेदना होतात, अशा विषयावर कुठेही राजकीय भूमिका मांडणे अत्यंत चुकीचे आहे. महिला, मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना भरचौकात आणून शिक्षा दिली पाहिजे’, असे स्पष्ट मत मांडत पंकजा मुंडे यांनी बदलापूर येथील चिमुकलींवरील लैंगिक अत्याचार प्रकणावर बोलताना संताप व्यक्त केला. या प्रकरणावरील कारवाई होत असताना फास्ट ट्रॅक कोर्टात आता नराधमाना शिक्षा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी असं वक्तव्य केले आहे.

Follow us
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.