मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कुठे-कुठे कोणाविरोधात कोण करणार बंड?

मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कुठे-कुठे कोणाविरोधात कोण करणार बंड?

| Updated on: Oct 30, 2024 | 11:12 AM

विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तिकीट न मिळाल्याने, किंवा पक्षातून डावलल्याने आपल्याच पक्षातून बंडखोरी केल्याचे पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात भाजपचे बंडखोर असा सामना दिसतोय. पाचोरा येथून किशोर पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत तर या ठिकाणी भाजपच्या अमोल शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. बुलढाणा येथे संजय गायकवाड हे शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. तर याच ठिकणी भाजपच्या विजयराज शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. मेहकरमधून शिंदेंच्या संजय रायमूलकर यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं तर प्रकाश गवई हे बंड कऱणार आहे. माजीवाडा येथे शिवसेनेकडून प्रताप सरनाईक तर त्यांच्याविऱोधात भाजपचे उपमहापौर राहिलेल्या हसमुख गेहलोत यांनी बंड केलंय. पैठणमध्ये शिंदेंच्या विलास भुमरे यांच्याविरोधात भाजपच्या सुनिल शिंदेंनी बंड केलंय. तर जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी तिकीट देण्यात आलं असून त्यांच्याविरोधात भाजपचे भास्कर दानवे यांची बंडखोरी पाहायला मिळाली. सिल्लोडमध्ये शिंदेंच्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपचे सुनील मिरकर यांची बंडखोरी तर सावंतवाडी येथे शिंदेंच्या शिवसेनेकडून दीपक केसरकरांना तिकीट तर भाजपकडून विशाल परब हे बंडखोरी करणार यासह अनेक मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Oct 30, 2024 11:12 AM