यवतमाळच्या शिंदोला साखरा ते जुगाद रस्त्याची बिकट अवस्था; भाजपकडून रस्ता रोको आंदोलन

यवतमाळच्या शिंदोला साखरा ते जुगाद रस्त्याची बिकट अवस्था; भाजपकडून रस्ता रोको आंदोलन

| Updated on: Aug 01, 2023 | 2:46 PM

प्रशासनाच्या मुजोरीपणामुळे यवतमाळच्या शिंदोला साखरा ते जुगाद या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे, त्यामुळे आज भाजपच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करीत कोळसा वाहतूक रोखण्यात आली.

यवतमाळ, 01 ऑगस्ट 2023 | सार्वजनिक बांधकाम, आरटीओ आणि डब्ल्यूसीएलच्या दुर्लक्षितपणामुळे 20 टन भारक्षमतेच्या रस्त्यावरून 50 टन कोळसा वाहतुक होते. पैनगंगा, कोलगांव, मुंगोली खाणीतून दररोज 500 वर वाहनं धावतात, त्यामुळे जागो जागी 2 फुट खोल आणि 7 फुट लांबीचे खडडे पडून त्यात पावसाचे पाणी व कोळशाची भूकटी साचून रस्ता चिखलमय व धोकादाय झाला आहे. परिणामी शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, बँक, दवाखाना, शेती प्रभावित होत असून लोकांचे रस्त्यामुळे प्रचंड हाल होत आहे. अपघात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळ मध्ये भाजपचे विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांनी वेकोली, सार्वजनिक बांधकाम व आरटीओ अधिकाऱ्यांना खडसावले. येत्या 15 दिवसात रस्त्याचे काम सुरू न केल्यास संपूर्ण कोळसा वाहतूक बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला.

Published on: Aug 01, 2023 02:46 PM