‘भावी मुख्यमंत्री’ बॅनरबाजीवरून बावनकुळे यांनी सडकून टीका; म्हणाले, ‘नेत्यांचे बॅनर’
कधी राष्ट्रवादी काँग्रेस, कधी काँग्रेस तर कधी ठाकरे गटाकडून 'भावी मुख्यमंत्री' म्हणून नेत्यांचे बॅनर कार्यकर्त्यांकडून लावले जातात. आता अकलूज येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे देखील 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर लागले होते. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआवर टीका केली आहे.
पुणे : गेल्या काही दिवसापासून राज्यातील महाविकास आघाडीमध्ये ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून वेगवेगळ्या नेत्यांचे बॅनर लागलेले पहायला मिळत आहेत. कधी राष्ट्रवादी काँग्रेस, कधी काँग्रेस तर कधी ठाकरे गटाकडून ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून नेत्यांचे बॅनर कार्यकर्त्यांकडून लावले जातात. आता अकलूज येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे देखील ‘भावी मुख्यमंत्री‘ म्हणून बॅनर लागले होते. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआवर टीका केली आहे. तर महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री आहेत असा खोचक टोला लगावाल आहे. त्यांनी काँग्रेसकडे 3 राष्ट्रवादीत 3, तर शिवसेनेकडे दोन मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं हा आकडा सध्या 8 असला तरी एखादा दुसरा आणखी वाढेल. हा आकडा दहा होईल. त्यामुळे दहा मुख्यमंत्र्यांचे हे तीन पक्ष आहेत अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
Published on: Jun 25, 2023 01:35 PM
Latest Videos