बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका; वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाले, ‘अल्झायमर झालाय’
याचदरम्यान त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून शुभेच्छा देण्यासह टीकाही होत आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांना टोला लगावताना टीका केलीय. त्यांनी उद्धव ठाकरे हे शतायुषी होवो… अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई, 27 जुलै 2023 | उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून शुभेच्छा देण्यासह टीकाही होत आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांना टोला लगावताना टीका केलीय. त्यांनी उद्धव ठाकरे हे शतायुषी होवो… अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर याच्या आधी ठाकेर यांनी एक हजार भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं होतं. आता ते हे सगळं विसरलेत. पण आता अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात न गेलेले ठाकरे हे मोदींना नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. त्याला अल्झायमर म्हणतात. अशी टीका बावनकुळे यांनी टीका केली आहे. त्यावरर खासदार संजय राऊत यांनी पलटवार करताना प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत यांनी, बावनकुळे यांना सुनाताना कोण बावनकुळे? त्यांची लायकी आहे का? ठाकरे यांच्यावर टीका करायला. त्यांनी आधी स्वत:चा पक्ष काढावा असा टोला लगावला आहे. तसेच जर त्यांनी तसं केलं तर आपण स्वतः बावनकुळेंचा सत्कार करू असे देखील राऊत यांनी म्हटलं आहे.