VIDEO |बावनकुळे यांची बच्चू कडू यांच्यावर जोरदार टोला, म्हणाले, ‘कुठली जागा?’

VIDEO |बावनकुळे यांची बच्चू कडू यांच्यावर जोरदार टोला, म्हणाले, ‘कुठली जागा?’

| Updated on: Aug 26, 2023 | 8:10 AM

प्रहारचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जागा वाटपात १५ जागा मागितल्या होत्या. तर कशा द्यायच्या याचा अभ्यास युतीने करावं अशा टोला लगावला होता. त्यावरून आता त्यांना भाजपकडून प्रत्युत्तर मिळाले आहे.

नागपूर : 26 ऑगस्ट 2023 | राज्यात आता काही महिन्यानंतर लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आपल्या ताकदीप्रमाणे मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. याचदरम्यान प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकांवरून महायुतीची कोंडी करण्याच्या प्रयत्न केला आहे.

कडू यांनी थेट १५ जागांची मागणी केली होती. तर त्या जागा भाजप देणार का या प्रश्नावर कडू यांनी ते त्यांना ठरवावं असा टोला भाजपला लगावला होता. तर आमचे १०-११ आमदार येतील असा दावा केला होता. त्याचबरोबर आम्ही बसू तेथे सत्ता आणि उठलोकी सरकार पडेलं असा इशाराच त्यांनी भाजपला दिला होता. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडू यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी बावनकुळे यांनी जागा वाटपावरून बोलताना महायुतीत कुठली जागा कुणाला द्यायची हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं असं म्हटलं आहे. तर कुणी कितीही हवेत गोळ्या मारल्या तरी उपयोग नाही असा टोला देखील बावनकुळे यांनी कडू यांना लगावला आहे.

Published on: Aug 26, 2023 08:10 AM